शेंदूर्णी प्रतिनिधी । पहुर पोलीस स्टेशनमध्ये ५ नोव्हेंबरपासून प्रथमच पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले असून नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या अवैध धंदेवाल्यावरील धडक कारवाईने शेंदूर्णी व परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून या 8 धंद्यावाल्यांविरोधात कारवाई होत नसल्याने अवैध धंद्याचा परिसरात सुळसुळाट झाला होता. गावातील चौकाचौकात व मुख्य रस्त्यावर या धंद्यांचे बस्तान बसवले होते तसेच नामदेव नगर परिसरातील अवैध धंदेवाल्यांचा मस्तवाल पणा इतका वाढला होता की त्यांचे बेमुर्तपणा व अरेरावीचा सामान्य जनतेला त्रास होत होता. परंतु कारवाई होत नसल्याने जनता पण हताशपणे सर्व सहन करत होती एकाच महिन्यात शेंदूर्णी दुरक्षेत्राचे हद्दीतील कारवाईचा उच्चांक झाला. अवैध धंदेवाल्यांचे या कारवाईने धाबे दणाणले आहे. अवैध सट्टा पत्त्यांचे व गावठी दारुच्या धंद्यावर कारवाई होत असल्याचे दिसत असले तरी पहुर पोलीस स्टेशन हद्दीतील शेंदूर्णी व परिसरातील खेड्यातील प्रत्येक पान टपरी व दुकानांमध्ये बंदी घातलेला गुटखा व सुगंधी पान मसाला सहजपणे विकला जात असल्याने त्या विरोधात केव्हा कारवाई होणार असा प्रश्नही सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.
महाविद्यालयीन युवकांना गुटख्याचे व्यसन लागत आहेत म्हणून अवैध गुटका व्यावसायिकांवर कारवाई होणे अपेक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध धंद्यावरील कारवाई बाबत पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी कारवाईत सातत्य ठेवणार असल्याचे सांगितले असून यापुढे मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले आहे.पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या नेतृत्वाखाली अवैध धंदेवाल्यांचे विरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे,पो.ना.किरण शिंपी व प्रशांत विरणारे यांनी छापे मारी करून गुन्हे नोंदविले आहे.