धनाजी नाना महाविद्यालयात ताण-तणाव मुक्त व कॉपी मुक्त परिक्षा अभियान कार्यशाळा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धनाजी नाना महाविद्यालयाचे परीक्षा विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दि. 13/09/24 शुक्रवार रोजी कॉपीमुक्त अभियान अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शंकर जाधव होते. कॅप्टन डॉ.आर.आर. राजपूत यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या जीवनातील परीक्षेचे महत्त्व सांगितले. प्रमुख मार्गदर्शक प्रा.अचल भोगे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेत विद्यार्थ्यांकडून कळत- नकळत होणाऱ्या चुका कोणत्या व त्या कशा टाळता येतील आणि परीक्षेत विद्यार्थ्यांकडून होणारे गैरप्रकार व त्यांच्या वरती विद्यापीठाकडून होणारी कारवाई तसेच परीक्षेत येणारा ताण कमी होण्यासाठी योगा व प्राणायाम, परीक्षेतील आहार व वेळेचे नियोजन करणे असे उपाय सुचविले.

अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना हॉलटिकट चे महत्त्व, विद्यापीठाकडून कधी एखाद्या विषयाची दिनांक व वेळ बदल झाल्यास त्याबाबत जागरूक रहावे शिस्त पाळावी अशी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार डॉ.आर.आर राजपूत यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. एम. झेड. सुरवाडे, उपप्राचार्य डॉ. एच. जी. नेमाडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चिराग चौधरी, शेखर महाजन व राम कोळी यांनी मेहनत घेतली.

Protected Content