जळगाव (प्रतिनिधी) शहरातील महर्षी वाल्मिक नगर (जैनांबाद) मधील नागरिकांनी आज सकाळी वीज बिलाची थकबाकी माफ होऊन नवीन मीटर बसविण्यात यावे, या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन सुरु केले आहे.
या संदर्भात अधिक असे की, महर्षी वाल्मिक नगर (जैनांबाद) परिसरातील बहुतांश नागरिक हे महावितरणचे थकबाकीदार आहेत. त्यामुळे महावितरने अनेकांचे मीटर जप्त करून नेले आहेत. थकबाकीदार असल्यामुळे नवीन मीटर देखील या परिसरातील नागरिकांना मिळत नाही. पर्यायी आकोडे टाकून बऱ्याच ठिकाणी घरात लाईट वापरली जाते. परंतू या गोष्टी बंद होत, नागरिकांना नवीन मीटर बसवून मिळाले पाहिजे. थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ही थकबाकी माफ झाली पाहिजे. कारण या परिसरात मोठ्या वर्गात कामगार व हातावर पोट भरणारी नागरीक राहतात. त्यामुळे सहानभूतीपर विचार करून महावितरणने थकबाकी माफ करत नवीन मीटर द्यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे. यावेळी मोठ्या संख्येने महिला देखील आंदोलनात सहभागी होत्या. दरम्यान, आमचा राजकारण्यांवर विश्वास नाही. आम्हाला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाहीत, अशी भूमिका तूर्त नागरिकांनी घेतल्यामुळे शेवटचे वृत्त येईपर्यंत रास्तारोको आंदोलन सुरूच होते