भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भडगाव तहसील कार्यालय येथे जागतिक ग्राहक दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्रीमती शीतल सोलाट, तहसीलदार भडगाव, यांनी भूषवले. शासनाच्या निर्देशानुसार या कार्यक्रमात लोकगीत आणि पथनाट्याचा समावेश करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शाहीर परमेश्वर सूर्यवंशी आणि त्यांच्या चमूने “शाश्वत जीवनशैली” या यंदाच्या मुख्य संकल्पनेसह ई-केवायसी या दोन विषयांवर आधारित पथनाट्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय श्री. अनिल देशमुख यांनी “शाश्वत जीवनशैली” या विषयावर मार्गदर्शन करत उपस्थितांना मौलिक माहिती दिली.
या कार्यक्रमाला पुरवठा निरीक्षक डी. व्ही. अमृतकार, गोदाम व्यवस्थापक एस. एस. गढरी, पुरवठा लिपिक एस. आर. पाटील आणि एम. एस. निकम उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय ग्राहक संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनिलजी देशमुख, जिल्हा कार्यकारणीतील गिरीश दुसाने, सुधाकर पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे भडगाव तालुका अध्यक्ष सुरेश रोकडे, प्रा. सुरेश कोळी, दिनेश पाटील, आकाश पाटील, निलेश बडगुजर, रास्त भाव दुकानदार संघटनेचे जयवंत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने रेशन दुकानदार, नागरिक, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि समारोप डी. व्ही. अमृतकार यांनी केले. हा कार्यक्रम ग्राहक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यात यशस्वी ठरला.