Home प्रशासन जिल्हा परिषद यावल शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद ; कारवाईची मागणी

यावल शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद ; कारवाईची मागणी

0
152

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांच्या आक्रमक वर्तनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) जळगाव जिल्हा पूर्व विभागाचे उपसंघटक नितिन सोनार यांनी यावल नगर परिषदेकडे तात्काळ कारवाई करण्याची ठाम मागणी केली आहे.

यावलमधील नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गंभीर स्वरूप धारण करत असून, वाहनधारकांच्या अंगावर धावून जाणे, शाळकरी मुलांना घाबरवणे हे प्रकार आता रोजचे झाले आहेत. विशेषतः सकाळी व संध्याकाळी नागरिकांना कामावर जाताना किंवा मुलांना शाळेत सोडताना कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कुत्र्यांचे टोळके एकत्र फिरत असल्याने त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अधिक कठीण झाले आहे.

विस्तारित वसाहतींमध्ये या भटक्या कुत्र्यांनी पाळीव जनावरांवर हल्ले केले असून अनेक नागरिकांच्या शेळ्या देखील फाडल्या गेल्याचे प्रकार घडले आहेत. ही परिस्थिती उद्रेक होण्याआधीच नियंत्रणात आणणे अत्यावश्यक आहे. अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये रोष असून, प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यास हे संतापात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर नितिन सोनार यांनी यावल नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे प्रभारी अधिकारी शेळके यांची भेट घेतली. त्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून घेत, तात्काळ बंदोबस्ताची मागणी लेखी स्वरूपात केली. यावल शहरात अशा मोकाट कुत्र्यांमुळे भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी आरोग्य विभागाने त्वरीत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.


Protected Content

Play sound