Home क्राईम अनोळखी व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू

अनोळखी व्यक्तीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू


suside
 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील चित्रा टॉकीज समोर शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्ती बेशुध्दावस्थेत पडलेला होता. जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना रात्री बारा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

 

याबाबत माहिती अशी की, परेश अग्रवाल यांनी चित्रा टॉकीज समोरुन एका अनोळखी व्यक्तीला उचलून बेशुध्दावस्थेतील अनोळखी व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतू उपचारादरम्यान, रात्री बारा वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हा रुग्णालयातीयल वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सोनवणे यांनी खबर दिल्यावरुन शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार उल्हा चऱ्हाटे करीत असून ओळख पटविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


Protected Content

Play sound