यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासी वस्ती गावपाड्यांवर मोठ्या प्रमाणावर अवैद्य गावठी दारूची सर्रासपणे विक्री होत आहे. त्यामुळे अल्पवयीन मुले दारूचा आहारी जात असल्याचे मृत्यूला सामोरे जात आहे. ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव मंजूर करून पोलीसांनना निवेदन देण्यात आले आहे.
सातपुडा पर्वताच्या अतीदुर्गम क्षेत्रातील गाडऱ्या जामन्या, उसमळी, लंगडा आंबा या मध्यप्रदेश राज्याच्या सिमे वर लागुन असलेल्या गावपाड्यांवर गेल्या अनेक दिवसांपासुन सर्रासपणे विविध प्रकारची रसायनीक व हातभट्टीची गावठी दारूची मोठ्या प्रमाणावर सर्वत्र खुलेआम विक्री करण्यात येत असल्याने अनेक तरूण व अल्पवयीन मुल हे दारूच्या आहारी जावुन व्यसनाधीन होवून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे आयुष्य उध्दवस्त होत आहे. या संदर्भात महिला वर्गाकडून सतत होणाऱ्या दारूबंदीच्या मागणीला गाडऱ्या जामन्या या ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच मोती जुगा बारेला यांनी महिलांच्या दारूबंदी संदर्थातील मागणीची दखल घेत गाडऱ्या जामन्या, उसमळी, लंगडा आंबा या गावातुन अवैद्य मार्गाने विक्रीस जाणाऱ्या दारूची विक्री बंद करावी असा ठराव ग्रामपंचायत व्दारे घेण्यात आलेल्या ग्रामसभेत घेतले आहे. या संदर्भातील संबधीत दारू विक्रत्यांवर कार्यवाही करण्यात यावी असे पत्र यावलचे पोलीस निरिक्षक यांना देण्यात आले आहे.
या निवेदना मोठ्या प्रमाणावर गाडऱ्या जामऱ्या ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहे .दरम्यान पोलीसांनी वाघझीरा या ठिकाणी केलेल्या दारूबंदीच्या कार्यवाहीचे स्वागत करण्यात येत असुन,तरी या आदी देखील यावल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या वतीने ग्रामसभेत ठराव करून सदरच्या अवैधरित्या विक्रीस जाणाऱ्या दारू बंद करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने व उत्पादन शुल्क विभागाने या कार्यवाही देखील लक्ष वेधावे अशी मागणी होत आहे .