यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील रेशनचा काळाबाजार थांबवून आदिवासी बांधवांना धान्य तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी आदिवासी भिल्ल एकता मंचचे यावल निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना निवेदन देवून केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यात आदीवासी बांधव मोठ्या संख्यने राहत असून मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उर्दरर्निवाह करीत असतात. आदिवासींकडे शिधापत्रीका असूनही धान्य मिळत नाही. स्वस्त धान्य दुकानदार हे धान्य घेणाऱ्या आदीवासी बांधवांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जत आहे. शिवाय यावल तालुक्यातील एक ही स्वस्त धान्य दुकानावर सुचना फलक लावण्यात येत नाही . अनेक स्वस्त धान्य दुकानदारांचे वजनकाटे हे प्रमाणीत केलेले नसल्याचे ही दिसुन येत आहे. तसेच तालुक्यातील आदीवासी गोरगरीब व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेत धान्याचा साठा जमवुन तो पध्दशीरपणे काळया बाजारात विक्री केली जात आहे. याची चौकशी करून कार्यवाही करावी तसेच शिधापत्रीकाधारक आदीवासी बांधवांच्या कुटुंबाला त्वरीत धान्य देण्यात यावे अशी मागणी केली आहे. अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी संघटनेचे जिल्हा कार्यध्यक्ष फिरोज तडवी , जिल्हा संघटक रब्बील तडवी , जिल्हा सहसचिव फत्तु तडवी, तालुका अध्यक्ष सरदार तडवी , रहीम तडवी , रूबीना तडवी ,रूखसाना तडवी, आशा तडवी , सायरा तडवी यास्मीन तडवी आदी उपस्थित होते.