पाचोरा प्रतिनिधी । बांगलादेशात होत असलेल्या अत्याचाराचे पडसात त्रिपुरा राज्यात उमटत असून मुस्लिम बांधवांवर होणारे अत्याचार थांबवा, अशा मागणी सुन्नी मदरसा पंजतन पाक व मस्जीद ए अहेलेसुन्नत नजीर संघटनेतर्फे आज दि. १२ रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात हिंदुत्ववादी काही संघटनांनी तेथील मस्जिद व मदरसांमध्ये दुर्गा पंडाल मधील पाक कुरानाची अवहेलना करण्यात आली होती. त्याचे पडसाद त्रिपुरा राज्यात पडल्याने तेथील भाजपाचे प्रदेश अध्यक्ष राजीव भट्टाचार्य, पापिया दत्ता व टिंकु राय यांचे नेतृत्वाखाली तसेच विश्व हिंदू परिषद, हिंदू धर्म जागरण मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्थानिक मुस्लिम बांधवांना भडकावुन भारतीय दंड संहिता १४४ लागु असतांना देखील विविध माध्यमातून दंगे व अत्याचार सुरू केला आहे. त्याठिकाणी मुस्लिम बांधवांच्या दुकानाची तोडफोड व लुटमार करत त्यांचेवर प्राणघातक हल्ला चढवला आहे.
या घटनेने त्रिपुरा सह आगरतला, धरमनगर मस्जिद, रतनवाडी मस्जिद, महारानी उद्यपुर मस्जिद, कृष्णा नगर मस्जिद व परिसरातील मुस्लिम बांधवांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण भारत देशात मुस्लिम बांधवांवर नेहमीच अत्याचार केले जात असल्याने या घटनांवर कायमस्वरूपी पायबंदी लावण्यात यावी या मागणीसाठी सुन्नी मदरसा पंजतन पाक व मस्जीद ए अहेलेसुन्नत नजीर या संघटने तर्फे आज दि. १२ रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रांत बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी मौलाना कादीर, शेख जावेद रहीम, शफीयोद्दीन मिस्तरी, अनिस शेख, मुजाहिद खान, जुबेर पिंजारी जाकीर खाटीक, मिसार मन्सुरी, नासिर खान, खाटीक सह सदस्य तसेच विविध सामाजीक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.