जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी तालुका कॉंग्रेस समितीच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर शिवलाल राजपुत व भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, जामनेर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जामनेर पोलीस स्थानकाला निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहेत की, जामनेर शहरात अनेक ठिकाणी खुलेआम सट्टा, जुगार अड्डे, गावठी दारू अड्डे खुलेआम सुरू आहे. या अवैध धंद्यांकडे तरुण पिढी आकर्षित होत असून या अवैध धंद्यामुळे अनेकांच्या घरात भांडणे होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहेत.त्यामुळे पोलीस निरीक्षक यांनी याकडे लक्ष देवून अवैध धंदे कडकडीत बंद करावेत.
यात पुढे म्हटले आहे की, जामनेर शहरातील अवैध धंदे आठ दिवसांच्या आत बंद न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहेत. या निवेदनाच्या प्रती माहिती व कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी यांना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहेत.
या निवेदनावर जामनेर तालुका कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर शिवलाल राजपुत, विजय पाटील, हरीष पाटील, संजय राठोड,सोनुसिंग राठोड, संदीप भाऊ, संदिपसिंग पाटील, शिवाजी राजपुत, राहुल मुळे यांच्या सह आदींच्या स्वाक्षर्या आहे.