कोल्हापूर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, प्रचारयुद्ध आता चव्हाट्यावर आले आहे. भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या रॅलीमध्ये दगडफेक झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजप नेत्या चित्रा वाघ यांची मुक्तसैनिक वसाहत इथं रात्री सभा सुरू पार पडली. सभा सुरू असताना एका बाजूने व्यासपीठाच्या दिशेने दगडे फिरकावण्यात आल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटर करून याबद्दल माहिती दिली आहे.
‘वा रे बहादुरांनो, समोर यायची हिंमत नाही म्हणून सभेत दगडे मारता का? असा सवाल त्यांनी ट्वीटद्वारे केला आहे. तसंच, ‘तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांना दाखवा असल्या थेऱ्यांना घाबरणारी चित्रा वाघ नाही’ असा इशाराही त्यांनी दिलाय. मात्र, चित्रा वाघ यांच्या सभेवर दगडफेक करण्यात आली आहे, याबद्दल पोलिसांमध्ये कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. पण, चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये मतदारांना पेटीएम द्वारे पैसे पाठवले जाणार असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ‘ज्या ज्या विभागात असे प्रकार घडतील आणि त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरणार आहोत’ असा इशाराही पाटील यांनी दिला