Home क्राईम साक्रीत आढळली चोरीस गेलेली टाटा मॅजिक

साक्रीत आढळली चोरीस गेलेली टाटा मॅजिक

0
107
magic vehicle
प्रतिकात्मक छायाचित्र-फाईल फोटो

magic vehicle

जळगाव प्रतिनिधी । येथून चोरीस गेलेली टाटा मॅजिक ही गाडी आज भुसावळ तालुक्यातील साक्री येथे आढळून आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश रघुनाथ चौधरी (वय ३८ राहणार हरिविठ्ठल नगर) यांची टाटा मॅजिक स्कूल बस क्रमांक (एमएच २१ व्ही ३१९४) हे शनिवार ६ जुलै रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात माहिती देण्यात आली. आज रविवार ७ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास सतीश चौधरी यांच्या खंडाळा येथील एक मित्राने टाटा मॅजिक गाडी ही भुसावळ ते साक्री रस्त्यावर दरम्यान उभी असल्याची माहिती दिली. त्यावरून मॅजिक वाहन घेण्यासाठी सतीश चौधरी गेले आहेत. याबाबत रामानंद पोलिसात गाडी चोरीबाबत कुठलीही नोंद नाही.


Protected Content

Play sound