नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच आज सकाळी शेअर मार्केट सुरू होताच सुरुवातीच्या दोन मिनिटातच सेन्सेक्सने ४० हजाराचा आकडा गाठला. तर निफ्टीने १२ हजारावर पोहोचले होते. थोड्याच वेळाने मात्र, शेअर बाजारात उलथा-पालथ सुरु होत.मार्केट अप-डाऊन व्हायला लागले.
आज सकाळी शेअर बाजार खुलताच बँकिंग सेक्टरच्या शेअरमध्ये झपाट्याने वाढ झाली. इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये एक टक्क्याने वाढ झाली तर कोटक बँक, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि एसबीआय बँकेचे शेअरही वरच्या स्तरावर पोहोचले होते. निफ्टीच्या ५० पैकी ३३ शेअरचे भाव वाढले आहेत, तर १७ शेअरचे भाव कोसळले आहेत.