जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रेमनगरातील श्री सप्तश्रृंगी मंदीरातून देवीची मुर्तीसह पितळी पादुका चोरून नेल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रेमनगरात श्री सप्तश्रृंगी देवीचे मंदीर आहे. या मंदीरात पंचधातूची देवीची मुर्ती व पादुका ठेवण्यात आलेल्या होत्या. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मंदीरात ठेवलेली २५ हजार रूपये किंमतीच पंचधातूची देवीची मुर्ती आणि ९०० रूपये किंमतीच्या पादूका अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर मंदीराचे पुजारी भुषण किशोर जोशी यांनी बुधवारी २० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ भारती देशमुख करीत आहे.