खाजगी प्राथमिक महासंघाचे विविध प्रश्नांबाबत वेतन अधीक्षकांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघच्या माध्यमातून विविध मागण्यांचे निवेदन वेतन अधिक्षिका आर.बी. संदानशिवे यांना आज देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सहाव्या वेतन आयोगाचा हप्ता बाकी असलेल्या शिक्षकांची माहिती मागून लाभ मिळावा. सन 2011 – 12 मध्ये कपात झालेल्या आयकराच्या रिटन बाबत प्रश्न मार्गी लावावा. वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत हमीपत्र घेऊन लागू करावी. टीईटी अपात्र शिक्षकांना त्यांचे हमीपत्र घेऊन वेतना बाबत निर्णय घ्यावा. वेतनेतर अनुदान वितरीत करण्याबाबत कार्यवाही व्हावी. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन पीएफची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत. DCPSची रक्कम NPS मध्ये वर्ग करणे बाबतची कार्यवाही व्हावी. NPS ची रक्कम वेतन झाल्यावर तात्काळ वर्ग होणे बाबत कार्यवाही व्हावी. थकीत पुरवणी बिले व वैद्यकीय बिलांच्या आपल्या स्तरावरून पाठपुरावा व्हावा. या मागण्या करण्यात आल्या आहेत.

प्रसंगी खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अशोक मदाने, जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा सचिव देवेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष गोविंदा लोखंडे, उपाध्यक्ष सुनिल पवार, तालुका सचिव अजित चौधरी, तालुका प्रसिद्धीप्रमुख योगेश भालेराव आदी उपस्थित होते.

 

Protected Content