भडगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील दोन नंबरचा व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना रात्री १० नंतर तास दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन सामान्य नागरीक सोमनाथ पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपल्या भडगाव शहरात व तालुक्यात दोन प्रकारच्या आस्थापना चालतात, दोन नंबरची आस्थापना व दुसरी व्यापाऱ्यांची आस्थापना आहे. आपण पोलीस प्रशासनामार्फत रात्रीची गस्त घालतात यादरम्यान आपण रात्री १० नंतर चालणाऱ्या व्यापाऱ्यांच्या आस्थापना म्हणजेच दुकानं बंद करतात हा आपला कायदेशीर अधिकार आहे. दुकानाबाहेर किंवा दुकानात असणाऱ्या नागरिकांनाही हाकलून लावतात. दुकानदारांना दमबाजी करून दुकानं बंद करायला सांगतात. परंतु मानवता धर्म म्हणून माझी एकच विनंती आपणास राहील की १० वाजेनंतर सुरु होणारी दोन नंबरची आस्थापनेचा एक तास कमी करून जर व्यापाऱ्यांना आपण एक तास वाढवून दिला तर त्या गरीब व्यापाऱ्यांचे भले होईल. गरीब व्यापारी हा ज्यांचे पोट रिकामे राहते तोच उशिरापर्यंत आपले दुकान सुरू ठेवतो.
मी आपणास दोन नंबरच्या आस्थापना बंद करा असं म्हणणार नाही. दोन नंबरच्या आस्थापनेबद्दल मला काहीएक म्हणने नाही. तो आपला कायदेशीर भाग असु शकतो. यासोबत फक्त आपण गरीब व्यावसायिकांचा मानवता धर्म म्हणून शहराचा व लोकसंख्येचा विचार करून रात्री ११ वाजेपर्यंत वेळ वाढवून द्यावा ही माझी रास्त अपेक्षा आहे. नाहीतर मी आपल्या पोलिस प्रशासनाचे काहिच करु शकत नाही. फक्त आपण सर्व आस्थापना ह्या कायदेशीर चालव्यात एवढी एकच अपेक्षा राहील. सामान्य नागरीक सोमनाथ पाटील यांनी नमूद केले आहे.