तीन वर्षांपासून प्रलंबित जिल्हा युवा पुरस्कार त्वरित मिळण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । युवक, युवती आणि सामाजिक संस्था अशा तीन श्रेणींमध्ये दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार जिल्ह्यातील तीन जणांना दिला जातो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार प्रलंबित असून तीन वर्षाचे एकून नऊ पुरस्कार त्वरीत देण्यात मिळावे, अश्या मागणीचे निवेदन आज जिंदगी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार प्रलंबित आहेत. युवक, युवती आणि सामाजिक संस्था अशा तीन श्रेणींमध्ये दरवर्षी तीन पुरस्कार दिले जातात. त्यामुळे तीन वर्षांचे एकूण नऊ पुरस्कार प्रलंबित आहेत. या संदर्भात गेल्या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया लवकर घेवून हे पुरस्कार जाहीर करून हे पुरस्कार लवकरात लवकर देण्यात यावे या संदर्भात जिंदगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुश्मिता भालेराव यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले.

 

Protected Content