Home Cities जळगाव आदिवासी संघर्ष समितीचे नाना पटोले यांना निवेदन

आदिवासी संघर्ष समितीचे नाना पटोले यांना निवेदन


भुसावळ प्रतिनिधी । आज जिल्हा दौर्‍यावर आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अन्यायग्रस्त आदिवासी संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले.

आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ते भुसावळहून फैजपूर येथे जाण्यासाठी निघाले असतांना त्यांना माजी मंत्री दशरथ भांडे यांच्या आदेशानुसार अन्यायग्रस्त आदिवासी संघर्ष समिती जळगाव जिल्ह्याच्या वतीने निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा नेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हाध्यक्ष नितीन कांडेलकर, सोपान सपकाळे जिल्हा संघटक. सुकलाल सांगलकर; मनोहर कोळी, मंगल कोळी, मनोहर कोळी, संदीप सोनवणे, संजय कांडेलकर, खेमचंद  कोळी, राहुल तायडे, संजय कोळी आदींसह समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound