फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभेच्या अधिवेशनात केन्द्र सरकारने वक्फ कायद्यात संशोधन करण्याचे बिल मांडले त्यात कोणतेही बदलाची आवश्यकता नसून यात हस्तक्षेप करू नये असे फैजपूर येथील कौमी एकता फाऊंडेशनच्या वतीने फैजपूर प्रांत अधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांना देण्यात आले.
केंद्रिय मंत्री मंडळात भारत सरकार संशोधन करुन वक्फ बोर्ड कायदा २०१३ संदर्भात बदल करीत आहे. वक्फ बोर्ड हे वक्फ अंतर्गत येणाऱ्या सर्व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी स्थापित केलेले आहे व सध्या भारत सरकार वक्फ बोर्ड कायद्यात बदल घडवून आणत आहे जेणे करुन वक्फ कायद्याचे मूळ स्वरुपात बदल होऊन त्याअंतर्गत असलेल्या मालमत्तेस हानी होऊन दुसरे इतर कोणीही त्यावर आपला हक्क गाजवू शकेल तसेच वक्फ बोर्डाच्या अधिकारास कमी करण्यात येवून व त्याच्या हक्कास हानी होईल अशा पध्दतीने बदल करणार आहे. असे भाकीत कळू लागले आहे.
तरी फाजपुर येथील कौमी एकता फाऊंडेशन यांच्या तर्फे सदरील वक्फ बोर्डच्या कायद्यातील बदलास तिव्र विरोध निवेदनाद्वारे करण्यात आले आहे. या प्रसंगी शेख जाफर, शेख कुर्बान,कलीम खा, सैय्यद असगर, शेख हमीद, शेख अलीम, शेख फारुक, शेख हकीम, शेर खान, अल्ताफ खान, शेख कलीम शेख जलीस, शेख कमरुद्दिन, शेख जावेद, जाफर अली यांच्यासह अनेकांच्या निवेदनावर सह्या आहेत.