रेशन दुकानदारांचे विविध मागण्यांसाठी धरणगाव तहसीलदारांना निवेदन

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील रेशनदुकानदारांच्या विविध समस्यांसह ऑनलाइन धान्य वाटप करतांना सर्व्हर डाऊन असल्याने मोठी अडचणी निर्माण होत असून ही समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १० ते १५ दिवसांपासून एनआयसी कंपनीद्वारे दिलेले ई-पॉस मशीन सर्वांची फ्रिक्वेन्सी व्यवस्थित व सुरळीत येत नसल्याने ही पॉस मशीन योग्यरित्या चालत नाही. यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पाणी पावसाचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील रेशनकार्डधारक हे तीन ते चार किलोमीटर अंतरावरून दुकानापर्यंत येतात. परंतु मशीन बंद असल्याने त्यांना विनाकारण मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे ग्राहक नाराज होऊन दुकानदाराला दोषी ठरवत अरेरावेची भाषा करतात. गेल्या १० दिवसांपासून धरणगाव शहरांमध्ये हा त्रास अधिक वाढला आहे. यात हाणामारीची देखील प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व्हर वारंवार बंद असल्याने ऑनलाईन धान्य वाटप करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. यावर त्वरित उपाययोजना करून हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे सदस्य निलेश ओसवाल अरविंद ओसवाल, बाबुलाल पाटील, श्रीकांत झवर, पी.टी.देवरे, डी. एस. पाटील, व्ही.पी. गुप्ता, एस.एस. पाटील, अनिता पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content