यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या काळात शासनाने मंजूर केलेल्या आदिवासी टोकरे कोळी समाजाला खावटी कर्जापासून वंचित ठेवण्यात आले असून या समाजाला योजनाच्या लाभ मिळावा, अशा मागणीचे निवेदन विनिता सोनवणे, जिल्हा प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग, यावल यांना देण्यात आले आहे.
या संदर्भात अँड गणेश सोनवणे व यावल तालुक्यातील आदीवासी टोकरे कोळी समाज बांधवाच्या यावल पचायत समिती कार्यलयातील आवारा पासून तर जिल्हा आदीवासी प्रकल्प कार्यलयाता पायपीट करुन विविध प्रकारच्या घोषना शासनाच्या विरोधात देत समाज बांधवांच्या विविध मागण्यांचे निवेदन साह्ययक प्रकल्प अधिकारी पी पी माहुरे यांना देण्यात आले.
आदिवासी टोकरे कोळी समाज वगळता इतर आदीवासी समाजातील नागरीकांचा खावटी कर्ज व कीराणा कीट वाटप करण्यात आले. मात्र टोकरे कोळी समाजाला या शासकीय लाभापासुन वंचित ठेवण्यात आले असून याबाबत शासनाच्या वतीने लवकरच निर्णय घेण्यात यावे, अन्यथा आदीवासी प्रकल्प कार्यलयावर समाजाच्या वतीने ४ जुलै रोजी आदोंलन करण्यात येईल असा ईशारा अँड गणेश सोनवणे (जळगाव) यांनी दिला आहे.
यावेळी वढोदा प्र.यावल येथील सरपंच संदिप सोनवणे, पाडळसा येथील खेमचंद कोळी, पिंप्री सरपंच येथील मोहन कोळी, योगेश कोळी अट्रावल, संदिप कोळी बोरावल, अँड विशाल सोनवणे विदगाव, कैलास सपकाळे अंजाळे, यशवंत सपकाळे, ज्ञानेश्वर तायडे पाडळसा, गोकुळ कोळी मनवेल, नंदकीशोर सोनवणे रीधुरी, पदमाकर कोळी डोंगर कठोरा, अनिल कोळी निमगाव, जगदीश सपकाळे कोसगाव यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.