जळगाव प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथील रेशनकार्ड धारकांना रेशन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहे. येत्या १५ दिवसांत रेशनधारकांना धान्य देण्यात यावे, अन्यथा ९ ऑगस्ट रोजी दांडी मार्च आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला आहे. आज शुक्रवारी २३ मार्च रोजी दुपारी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांची भेट घेवून मागणीचे निवेदन दिले आहे.
पंकज महाजन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नशिराबाद शहरात रेशन कार्डधारकांना अनेक दिवसांपासून समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच शहरात असलेल्या स्वस्त धान्य दुकानावर बऱ्याच लोकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारी आता वाढत आहे. नशिराबाद शहर शहरात जवळपास ५०० कुटुंबांना १२ अंकी क्रमांक मिळाला. परंतु धान्य मिळत नाही तर शहरात असलेल्या अडीच हजार कुटुंब आहेत ज्यांना रेशनकार्ड आहे. परंतु १२ आकडी क्रमांक मिळाला नसल्याने स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही. त्याचप्रमाणे रेशनकार्डधारकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वाढवणे किंवा कमी करणे, यासाठी वणवण फिरावे लागत आहे. दरम्यान शासनाने प्रत्येक कुटुंबाला कोरोना काळात मोफत धान्य दिल्याचे जाहीर केले आहे. मात्र नशिराबाद येथील काही लाभार्थ्यांना अद्यापपर्यंत त्याचा फायदा झालेला नाही. या संदर्भात एक वर्षांपूर्वी देखील या समस्यांचे निवेदन तालुका प्रशासनाला देण्यात आले होते. यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. दरम्यान येत्या १५ दिवसात नशिराबाद शहरातील सर्व रेशनधारकांच्या समस्या सोडवाव्यात अन्यथा ९ ऑगस्ट २०२१ रोजी नशिराबाद येथील रेशनकार्डधारक सहित तहसील कार्यालयावर पाहिजेत ‘दांडी मार्च’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन, विनोद रंधे, निलेश रोटे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र पाटील यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.