भुसावळ प्रतिनिधी । शहरातील गौसीया नगरातील शौचालय दुरुस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन भुसावळ शहर महिला कॉग्रेस कमेटी तर्फे नगर परिषदचे उप-मुख्य अधिकारी यांना आज देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गौसीया नगर मुस्लिम कब्ररस्थान येथील १२ संडास आहे. त्यात ६ महिला व ६ पुरुषांची आहे. शौचालयाची अवस्था अत्यत खराब झालेली आहे. त्यासाठी महीला काँग्रेस कमेटी तर्फे निवेदन देऊन त्वरीत शौचालय दुरुस्त करावी, यासाठी निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी भुसावल शहर महिला कॉग्रेसची अध्यक्षा यास्मीन बानो शे युसुफ, शहर उपाध्यक्ष हमीदा गवली, जिल्हा उपाध्यक्ष रानी खरात, सूजाता सपकाळे, वंदना चव्हाण, दुर्ग सोनोवणे, जिला अल्पसंख्यॉक विभाग चे जिल्हा अध्यक्ष मो मुनव्वर खान, भुसावल विधानसभा युवा अध्यक्ष ईम्रान खान, शहर अध्यक्ष अल्पसंख्यॉक विभाग सलीम गवली, शहर उपाध्यक्ष विलास खरात, शहर सचीव शैलेश अहीरे, असगर भाई व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.