भुसावळ प्रतिनिधी । खंडाळा ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमी योजना व 14 वित्त आयोग दलित वस्ती सुधार योजना तसेच स्वच्छ भारत मिशन या योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार राष्ट्रीय दलित पँथरतॅर्फे गटविकास अधिकऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तसेच खालील मागण्याचे निवेदन देखील देण्यात आले आहे, स्वच्छ भारत मिशन या योजनेची चौकशी दि.५/७/ २०१९ ला आपण पाठविलेले कर्मचारी स्वप्निल आदीवाल व शैलेंद्र चोपडे यांना त्यांच्यासोबत तक्रारदार सुभाष जोहरे या सर्वांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन चौकशी केली असता लाभार्थ्यांनी आम्हाला लाभच मिळाला नाही तर शौचालय कसे बांधणार तर काही मयत लाभार्थ्यांच्या नावे निधी लाटला तर काही बोगस लाभार्थी दाखवून निधी लाटला आहे हे प्रत्यक्ष चौकशीअंती सिद्ध झाले आहे.
परंतु आपण खंडाळा सरपंच ग्रामसेवक यांच्यावर अद्याप गुन्हे दाखल केलेले नाही तरी आपण त्यांच्यावर शासनाची दिशाभूल करून फसवणूक करणे शासनाचा निधी लाटणे व भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे त्वरित गुन्हे दाखल करावे. दलित वस्ती योजने त खंडाळा गावात एकच दलित वस्ती मध्ये एकावर एक असे दोन ते तीन वेळा निधी मंजूर करून लाटला आहे असे पहाता खंडाळे गावात एकच दलित वस्ती आहे व त्यामध्ये पूर्वी रस्त्याची कामे झालेली आहे व दलितांना त्याची आवश्यकता नव्हती परंतु सरपंच ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने हा निधी मंजूर करून (अनुसूचित जातीच्या सदस्याला विश्वासात न घेता) हा सर्व प्रकार केलाय व २०१९ते २० चा मंजूर रस्ता तर पूर्ण सवर्ण वस्तीत केलेला आहे व दलितांवर अत्याचार केलेला आहे म्हणून या कामाची चौकशी सुद्धा तक्रारदाराला सोबत घेऊन करावी व सरपंच ग्रामसेवक यांच्यावर दलित अत्याचार प्रतिबंध व भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याने कार्यवाही करावी, 14 व्या वित्त आयोग या योजनेचे सुद्दा यांनी फक्त ४ ते ५ कामे केल्याचे दाखवले आहे.
यात सुद्धा यांनी लाखो रुपये लाटले आहे हे नाकारता येत नाही. आणि त्यातील अनुसूचित जातीचा पंधरा टक्के येणारा निधी पैकी सरपंच व ग्रामसेवक यांनी तीस ते चाळीस हजार रुपये खर्च केला आहे व उर्वरित निधी यांनी भ्रष्टाचार (हडप) केला आहे. म्हणून ग्रामसेवक या विषयाची माहिती देत नाही. म्हणून या तक्रारीची चौकशी सुद्धा आपण त्वरित करावी व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा संघटनेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जि प जळगाव यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल याची आपण गंभीर दखल घ्यावी असे निवेदन भुसावळ गटविकास अधिकारी विलास भटकर यांना राष्ट्रीय दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हा सरचिटणीस प्रेमचंद सुरवाडे, जिल्हा सचिव सुभाष जोहरे, तालुका उपाध्यक्ष शरद सुरवाडे, व कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती अशोक पाटील, यांनी खंडाळा सरपंच ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे