यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली गावातील प्रभाग क्रमांक तीनच्या खालच्या गावात मुख्य रस्त्यावरील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सरपंच कलिमा तडवी आणि ग्रामसेवक आर.टी. बाविस्कर यांना निवेदन देण्यात आले.
या आशयाचे निवेदन अर्जदार ग्रामपंचायत सदस्य तथा राष्ट्रवादीचे तालुका युवक अध्यक्ष अॅड.देवकांत बाजीराव पाटील, शोभा युवराज पाटील , ग्रामपंचायत सदस्य शकुंतला विजयसिंह पाटील, ग्रामपंचायत सदस्य हमीदा टेनु तडवी व ग्रामस्थ यांच्या वतीने देण्यात आले वरील निवेदनानुसार खालचे गाव विरावली गावात या ठीकाणी बस स्थानकापासून ते नजीर तडवी यांच्या घरापर्यंत येण्या-जाण्यासाठी पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात चिखल होऊन पादचाऱ्यांना पायदळी चालणे कठीण होत आहे यात लहान मुले म्हातारी माणसे यांना पडण्याची भीती निर्माण झाली असुन , तसेच हा रस्ता पावसाळ्यात चालणे योग्य राहत नाही म्हणून या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे अशी सर्व खालचे गाव विरावली वार्ड क्रमांक तीन मधील गामस्थांची मागणी आहे म्हणून ग्रामपंचायतीने या विषयी काळजी घेवुन आपण प्राध्यान्याने या मार्गाचे १५ व्या वित्त आयोगातून या रस्त्ता तयार करावा अशी मागणी करण्यात आली असुन तात्काळ ग्रामपंचायतीने या रस्त्याच्या कामास मान्य करून रस्त्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशा आशयाचे निवेदन आज दिनांक २५ रोजी विरावलीचे ग्रामसेवक रविन्द्र बाविस्कर यांना देण्यात आले आहे.