जळगाव प्रतिनिधी । आज भारतीय जनता पार्टी जळगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार जळगाव यांना पावसामुळे पिकांचे पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, यासाठी बबनरावजी चौधरी प्रदेश उपाध्यक्ष भाजपा यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की या हंगामात मुख्य पीक असलेले उडीद मूग सोयाबीन कापूस या पिकांची शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पेरणी केली परंतु नंतर पावसाने दडी मारल्यामुळे उभे पीक करायला लागलेले असून यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहे पूर्णपणे खचलेले असून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी पावसाअभावी जळालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी… यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन भाऊ पाटील तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे सरचिटणीस अरुण सपकाळे पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील तालुका सरचिटणीस गिरीश वराडे तालुका युवा मोर्चा सरचिटणीस सुदाम राजपूत शक्ती केंद्र प्रमुख नरेंद्र बळीराम पाटील यांच्यासह तालुका भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते…