सेतू सुविधा केंद्र सुरु करण्याबाबत निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र सुरु करा, अशी मागणी जळगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना आज निवदेन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जनतेच्या संबंधित विविध प्रमाणपत्रांचे दाखले, सात बारा, आठ अ हे जळगाव जिल्ह्यामध्ये महा ई सेवा केंद्रामार्फत दिल्या जात आहेत. परंतू जनतेने महा ई सेवा केंद्र चालक हे वाजवी दरापेक्षा जास्त प्रमाणात पैसे घेतात, प्रमाणपत्र वितरीत करण्यात अडवणूक करुन आर्थिक लुबाडणुक करतात व प्रमाणपत्रही वेळेवर दिल्या जात नाहीत, अशा तक्रारी केल्या आहेत.

सदर तक्रारींच्या अनुषंगाने महा ई सेवा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र चालू करण्यात यावे जेणेकरून जनतेची लुबाडणूक न होता शासनाने निश्चित केलेल्या वाजवी दरामध्ये व विहिरीत विहित मुदतीत जनतेला विविध प्रमाणपत्रांचे दाखले मिळतील. तसेच सदर सेतू सुविधा केंद्र हे तहसीलदार यांच्या निगराणीखाली असल्याकारणाने सदर सेतू संचालक हे जनतेची लुबाडणूक व अडवणूक करणार नाहीत.

तरी आपण या सर्व बाजूंचा विचार करून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात चालू असलेल्या सेतू सुविधा केंद्रा प्रमाणे जळगाव जिल्ह्यातही सेतू सुविधा केंद्र कार्यान्वित करण्यात करण्यासाठी विविध नियमानुसार कार्यवाही करून करावी जेणेकरून जळगाव जिल्ह्यातील जनतेची आर्थिक लुबाडणूक थांबवली जाईल, असा निवेदनात म्हटले आहे.

 

Protected Content