बस सेवा सुरु करण्याबाबत निवेदन

यावल प्रतिनिधी । मागील एक ते दीड वर्षांपासुन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे बंद असलेली ग्रामीण भागातील बससेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव यांना निवेदनव्दारे केली आहे.

दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राकेश सोनार यांनी निवेदन देऊन तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील अनेक दिवसांपासुन बंद पडलेली बससेवा तात्काळ सुरू करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात असे म्हटले आहे की कोरोनाची परिस्थिती यावल तालुक्यात आटोक्यात आली असल्याचे दिसत आहे. त्याच प्रमाणे शासना आता शाळेत व महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतले असुन अशावेळी ग्रामीण क्षेत्रातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी ग्रामीण भागातून शहरात येण्याच्या करीता मोठी अडचण निर्माण होत आहे. म्हणून ज्या प्रमाणे आपण यावल आगारातुन लांब पल्याच्या आंतरजिल्हा नंतर आंतरराज्य बस सेवा सुरू केली आहे.

त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक काळजी घेवुन ग्रामीण भागातील बस सेवा त्वरीत सुरू करावी, हि मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे तालुकाअध्यक्ष राकेश सोनार यांनी निवेदनातून केलेली आहे. यावेळी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव सोमवार पासुन ग्रामीण भागात बस सेवा सुरू करणार असे आश्वासन राकेश सोनार यांना दिले आहे.यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहरउपअध्यक्ष शरीफ तडवी, कार्याध्यक्ष महेंद्र तायडे, सुनिल इंगळे, जय अडकमोल, गणेश बडगुजर आदी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

 

 

 

Protected Content