यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली येथील ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक ३ गावामध्ये गटारींची व्यवस्था नाही. रस्त्यांवर इतरत्र सांडपाणी सोडले जाते. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तातडीने प्रशासनाने याकडे लक्ष देवून समस्येची सोडवणूक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदनव्दारे केली आहे.
या संदर्भात दि.१८ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या निवेदन राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य विरावली ऍड देवकांत बाजीराव पाटील व इतर ग्रामपंचायत सदस्य शोभा युवराज पाटील हमिदा टेनु तडवी, शकुंतला विजय पाटील यांनी दिले असुन या निवेदनावर प्रभाग तिनच्या मध्ये गटारी अभावी घाणीच्या सांडपाण्यामुळे परिसरात दृर्गंधी निर्माण झाली यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाले आहेत. या क्षेत्रात गटारीचे काम व्हावे या मागणी करीता देण्यात आलेल्या निवेदनावर माजी ग्राम पंचायत सदस्य पवन पाटील, माजी सदस्य रणधीर पाटील, माधव पाटील, प्रल्हाद पाटील, दीपक पाटील, प्रशांत पाटील, नामदेव पाटील , भूषण पाटील, बापू अजलसोंडे, यशवंत पाटील, हिरालाल पाटील, भूषण धनगर, विलास पाटील, धनराज पाटील, गोकुळ पाटील, चेतन पाटील, जिभु पाटील, कैलास पाटील, नथू पाटील, राजेश पाटील, राजेश अडकमोल, राहुल पाटील, देवेंद्र पाटील, संजय पाटील, गुलाब पाटील, शरद पाटील, प्रकाश पाटील ,प्रदीप पाटील ,जितेंद्र धनगर आदींच्या सह्या आहेत.
या निवेदनात विरावली गावात प्रभाग क्रमांक तिन मध्ये गटारींची स्थिती अत्यंत वाईट झाली असून गटाराचे घाणपाणी रस्त्यावर वाहत असून त्यावर रेंगाळणारे किडे हे नागरीकांच्या घरात पोहोचत असून यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याला निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . सध्या राज्यात covid-19 च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगात थैमान घातली असून या सारख्या संसर्गजन्य आजारांवर वेळीच प्रतिबंध व्हावा म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन लवकरात लवकर गटारीचा प्रश्न मार्गी लावावा तसे न झाल्यास प्रभाग क्रमांक तिन चे नागरिक लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करतील असा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. विरावली ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक तिनच्या नागरिकांची मागणी लवकरात लवकर मान्य करण्यात यावी या आशयाचे निवेदन आज दिनांक १८ ऑगस्ट रोजी ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे.