पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | देशातील वाढत्या जिहादी कट्टरता आणि हिंसाचाराच्या विरोधात कारवाई करण्यात यावी. यासाठी विश्व हिंदू परिषद (बजरंग दल) तर्फे पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले आहे.
दि. १६ जुन रोजी देण्यात आलेल्या निवेदनात “गेल्या काही काळापासून देशभरात जिहादी कट्टरता वाढत आहे. हिंदूंवर योजनापूर्वक हल्ल्यांह हिंदूंची घरे दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. तसेच सरकारी मालमत्ता आणि मंदिराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशातील हिंदू समाज दुखावला असून संतप्त झाला आहे. देशभरातून हिंदू समाज या घटने विरोधात धरणे आणि निवेदनाद्वारे तीव्र संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे जिहादी भाषणे देण्याऱ्या व्यक्तींना ताबडतोब थांबवावे, दंगल घडवणाऱ्या दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
देशात अलीकडेच घडत असलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या कारणावरून आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे निषेध करण्यात आला. या प्रकरणी हिंसाचार घडविण्याचा कट असून यात संपूर्ण देशाला वेठीस धरण्यात येत असून या समाज कंटकांवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी आंदोलकांनी केली. या अनुषंगाने दि. १६ जुन रोजी पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन पाटील, दिपक पाटील, योगेश पाटील, पप्पू चौधरीष धनराज भोई, योगेश देण्यात आले. यावेळी विश्व हिंदु परिषद प्रखंड मंत्री महावीर गौड, अतुल पाटील, योगेश पाटील, अभिषेक भोई, तन्वीर परदेशी, सचिन येवले, शुभम पाटील आदी उपस्थित होते. निवेदनाची प्रत देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठविण्यात आली आहे.