जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा दूध संघातील रोजंदारीने काम करणाऱ्या कामगाराचा अपघातात दुदैवी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नीस कायम नोकरी मिळावी, अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र सुवर्णकार सेना व अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगावाजवळ १३ मे रोजी सकाळी झालेल्या भीषण आपघातात जिल्हा दुध संघात रोजंदारीने काम करणाऱ्या धनराज सुरेश बिरारी (सोनार) (वय-३७) रा. शिवाजी नगर, जळगाव यांचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत जिल्हा दुध संघाकडून कोणतीही आर्थीक मदत देण्यात आलेली नाही. उलट मयताच्या कुटुंबियांवर पोलीसांनी लाठीचार्ज करून हाकलून लावले. या घटनेचा सुवर्ण समाजाच्या वतीने तिव्र निषेध व्यक्त करत दोषींवर कारवाई करण्यात यावी, मयताच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरी जिल्हा दूध संघात देण्यात यावी, ड्यूटी संपल्यावर देखील कामावर हजर असतांना झालेल्या अपघातात त्यांच्या मृत्यू झाला असून जिल्हा दूध संघाच्या व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. मयताच्या वारसांना ५० लाख रूपयांची आर्थीक मदत मिळावी यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.
याप्रसंगी सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा नगरसेविका रंजना वानखेडे, अध्यक्ष संजय विसपूते, विजय वानखेडे, संगिता विसपूते, राजश्री पगार, सुवर्णा बागुल, रुपाली वाघ, राजेश बिरारी, नितीन सोनार, मनोज सोनार, उमेश वडनेरे, राजेंद्र विसपुते, रमेश सोनार, अरुण वडनेरे, जगदीश देवरे, राजेंद्र दुसाने, शरद दंडगव्हाळ, विनोद दंडगव्हाळ, केतन सोनार, संजय पगार, लोटन भामरे, सागर बागुल, उमेध विसपुते, सुधाकर दुसाने, भगवान सोनार, सुरेश सोनार, प्रकाश बाविस्कर, बाळकृष्ण दुसाने, मयूर दुसाने, विपुल चव्हाण, उमेश सोनार यांच्यासह आदी उपस्थित होते.