जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील एरंडोल ते पिंपळकोठा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गवर शेतकऱ्यांसाठी समांतर रस्ता करून बोगदा निर्माण करावी यासह विविध मागण्यांसाठी स्थानिक व्यापारी, शेतकरी आणि सर्वपक्षीय संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एरंडोल ते पिंपळकोठा दरम्यान असलेला राष्ट्रीय महामार्ग ओलांडून शेतात ये-जा करत असतात शिवाय शेतकऱ्यांसह मजूर यांना येण्या जाण्यासाठी हा राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करावा लागतो, त्यामुळे दोन्ही बाजूने भरधाव वेगाने वाहने येतात.त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यापूर्वी देखील अनेक वेळा भीषण अपघात होऊन तीन ते चार जणांचा बळी गेलेला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी खासदार उमेश पाटील यांनी बैठक घेऊन समांतर रस्ता आणि बोगद्या संदर्भात बैठक घेतली होती, परंतु अद्यापपर्यंत यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कासोदा फाटा, एरंडोल रस्त्यावरील पिंपरी फाटा, एरंडोल शहरातील महाजन नगर ते दत्त मंदिरपर्यंत समांतर रस्ता, पथदिवे तसेच एरंडोल ते पिंपळकोठा दरम्यान समांतर रस्ता आणि बोगदे तयार करण्यात यावे, या मागणी केली आहे. ए
रंडोल तालुक्यातील शेतकरी, स्थानिक व्यापारी आणि सर्वपक्षीय संघटनांचे नेते यांनी मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन मागण्याची निवेदन देण्यात आले. याप्रसंगी बी.एस. चौधरी, कैलास महाजन, गोरख चौधरी, पंकज महाजन, विजय महाजन, देविदास महाजन, दुर्गादास महाजन, डॉ.प्रवीण वाघ, अशोक चौधरी, नानाभाऊ महाजन, महेंद्रसिंग पाटील, अरुण माळी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.