अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एस.टी. महामंडळाच्या अमळनेर परिक्षेत्रातील सेवानिवृत्त समुह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची भेट राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात भेट घेऊन एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बारमाही मोफत प्रवास मिळावा याबाबत निवेदन दिले.
याआधीही एसटी महामंडळातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहा महिने मोफत पास ही सवलत दिली जाते. परंतू कर्मचाऱ्यांनी महामंडळात ३०-३५ वर्ष सेवा दिलेली दिसते. तो मोबदला कमी सवलतीचा असतो. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी बारा महिन्याचा मोफत पास देण्यात यावा व मयत कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही व सवलत मिळावी. अशी मागणी अमळनेर परिक्षेत्रातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मंत्री अनिल पाटलांना निवेदन देऊन केली.