सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याची घटना समोर आली आहे. प्रकरणी सावदा येथील महाविकास आघाडीचे जाहीर निषेध करत विविध मागण्यांचे निवेदन सावधान पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर १० महिन्यापूर्वी मोठ्या थाटामाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आले होते. मात्र हा पुतळा भाजप संबंधित व्यक्तीला अनुभव नसताना काम दिले. परंतु हा पुतळा खाली कोसळल्याने या कामात भ्रष्टाचार असल्याचे दिसून आहे. या संपूर्ण घटनाबाबत महाराष्ट्र राज्यात जनतेतून संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणीची निवेदन सावदा येथील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. या संदर्भात सावदा पोलीस ठाण्यात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख भरत नेहेते, उप शहरप्रमुख गौरव भेरवा, शरद भारंबे, धनंजय चौधरी, मिलिंद पाटील, श्याम पाटील, एकलव्य कोल्हे, शेख अजगर शेख तुकडू, मुराद तडवी, सुनील राणे, रवींद्र बेंडाळे, मिलिंद पाटील, राहुल पाटील, पंकज येवले, धीरज करोसिया, मनीष परदेशी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.