विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा व महानगर बाराबलुतेदार संघटनेचे निवेदन

जळगाव प्रतिनिधी । बाराबलुतेदार समाजावर होणाऱ्या अन्यायासह इतर मागण्या महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशा मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा व महानगर बाराबलुतेदार संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना आज बुधवारी देण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा व महानगर बाराबलुतेदार संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओ.बी.सी. समाजाच्या आरक्षण मध्ये कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण हा समाज सहन करणार नाही. गरज पडल्यास हजारोंच्या संख्येने विधानभवनास घेराव केला जाईल, ओ.बी.सी. समाजाला आर्थिक, शासकीय, सामाजिक, आरक्षण लागू करावे. २) संपुर्ण देशात ओ.बी.सी.ची जातनिहाय जनगणना व्हावी, ३) सद्यस्थिती मध्ये असलेल्या आरक्षणा मधून कुणाही ईत्तर समाजास आरक्षण देवू नये. ४) बाराबलुतेदर समाजाला कोविड परिस्थितीमध्ये अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत असून त्यांच्या उदरनिर्वाहाच्या व्यवसायाला घरघर लागून सर्व छोटे समाज मरणासन्न अवस्थेला आलेले आहे त्यांना शासनाने विशेष पॅकेज अदा करावे. 

५) नाभिक समाजाच्या सलून, स्पा, हे उघडण्यास नाशिक, पुणे, मुंबई प्रमाणे परवानगी त्वरीत द्यावी, या समाजाचा रोजगार एक वर्षापासून जवळजवळ बंद असल्याने अनेक कारागिरांनी आत्महत्या केल्या त्यांचे परिवाराला सानुग्रह अनुदान द्यावे. आत्महत्याग्रस्त परिवारातील एक व्यक्तिस शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, विविध हस्त कौशल्यात पारंगत असलेल्या बाराबलुतेदार यांच्या या तीव्र भावनाआपण शासनापर्यंत पाठवाव्यात ही विनंती. आपल्या अधिकार क्षेत्रात असलेल्या सलून व्यवसायाला त्वरित उघडण्याची परवानगी द्यावी. आमच्या विनंती अर्जाची  सहानुभूतीपुर्वक विचार करुन न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले असून या निवेदनाचे प्रत माहितीस्तव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधीपक्ष नेते देवेद्र फडणवीस, सामाजीक न्याय विभाग, महाराष्ट्र राज्य, गुलाबराव पाटील, मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा यांना देण्यात आले आहे. 

 

Protected Content