महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या निषेधार्थ पाचोऱ्यात डॉक्टर असोशिएशनचे निवेदन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पश्चिम बंगाल मधील कोलकता येथे एका महिला डॉक्टरवर काही नराधमांनी अत्याचार करुन त्या महिला डॉक्टरचा निर्घृण खून केल्याची निंदनीय घटना घडली आहे. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असुन या घटनेतील नराधमांना तात्काळ फासावर लटकवण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज १७ ऑगस्ट रोजी पाचोरा डॉक्टर असोसिएशनतर्फे पोलिस प्रशासन व तहसिलदार यांना देण्यात आले आहे.

निवेदन देते प्रसंगी पाचोरा डॉक्टर असोसिएशनचे चेअरमन डॉ. भरत लाला पाटील, अध्यक्ष डॉ. अतुल पाटील, सचिव डॉ. हर्षल देव, सिद्धीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील, डॉ. जीवन पाटील यांचेसह पाचोरा डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Protected Content