यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आपल्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना एडल्ब्युबी / ३४६६ या संघटनेच्या जळगाव जिल्हा कार्यकारिणी शिष्ट मंडळाच्या वतीने केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांचा मुक्ताईनगर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री रक्षा खडसे यांना संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी त्यांचे स्वीय सहाय्यक तुषार राणे यांनी निवेदन स्वीकारले.
मध्य प्रदेश व गुजरात या दोन राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या सर्व संगणक परिचालकांना राज्य कर्मचारी म्हणून दर्जा देणे व त्यानुसार वेतन व इतर भत्ते देण्याबाबत केंद्रीय पंचायतराज मंत्रालय, व ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पत्र दिले जाईल असे आश्वासन त्यांच्याकडून शिष्टमंडळास देण्यात आले, यावेळी संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्रावण बोदडे, जिल्हा उपाध्यक्ष कन्हैया पाटील, जिल्हा संघटक प्रभाकर तायडे,जिल्हा संपर्कप्रमुख रौनक तडवी,जिल्हा कोषाध्यक्ष तुषार चौधरी, राज्य प्रतिनिधी राहुल मोरे, जिल्हा सहसचिव दिगंबर पवार यांच्यासह संघटनेचे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.