विविध मागण्यांसाठी निळे निशाण संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ कायमस्वरूपी डॉक्टराची नेमणुक करण्यात यावी आणि यावल तालुक्यातील दलित – आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ निळे निशाण संघटनेचा मोर्चा तात्काळ न्याय न मिळाल्यास भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला.

१ ) ग्रामीण रुग्णालय यावलचे वैदकिय अधिक्षक यांनी शासनाची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने दिलेल्या लेखी पत्राची चौकशी करण्यात यावी.
२) यावल ग्रामिण रुग्णालयात कायम स्वरूपी विविध तज्ञ डॉक्टरांची नेमणुक करण्यात यावी.
३) प्रसुती करिता आलेल्या महिलेस सिझर करण्याची गरज असल्यास तात्काळ सिजर करण्याची व्यवस्था करण्यात यावी.
४) यावल ग्रामीण रुग्णालय येथे तात्काळ स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचीया नेमणूक करण्यात यावी.
५) आपातकालिन समयी तात्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात यावी.
६) नवजात शिशु यांचे अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात यावे.
७) नियोजनाच्या शस्त्रक्रिया सुरू करण्यात याव्या.
८) तालुक्यातील धुळेपाडा व टेंभीकुरण या गांवातील दलित – आदिवासी समाजाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेऊन त्यांना त्यांच्या हक्कापासुन वंचीत ठेवल्या प्रकरणी तसेच टेंभीकुरण गांवाच्या संदर्भात म.आयुक्त नाशिक यांच्या अधिसुचनांची अमंलबजावणी न केल्यामुळे यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी यांचे विरुद्ध कारवाई करण्यात यावी.

या वरील सर्व मागण्यासह तालुक्यातील अनेक समस्यांच्या निवेदन निळे निशाण संघटनेच्या यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना देण्यात आले. येत्या आठ दिवसात मागण्या पुर्ण न झाल्यास तहसिलदार कार्यालय यावल येथे संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. त्या प्रसंगी जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव निकम, फैजपुर विभागीय उपाध्यक्ष इकबाल तडवी व अनिल इंधाटे, यावल तालुका युवक अध्यक्ष सागर तायडे, मांगीलाल भिलाला, नानु बारेला, मिलीद सोनवणे, इंदिरा भिलाला, सपना सोनवणे, मनिषा बागुल, विजया सोनवणे, दिपक मेढे, रविंद्र मेढे, अनिल तायडे, जगन तायडे व असंख्य महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content