Home प्रशासन तहसील भुसावळ सकल जैन समाजाचे तहसीलदारांना निवेदन

भुसावळ सकल जैन समाजाचे तहसीलदारांना निवेदन


भूसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कर्नाटक राज्यातील हिरेकोडी येथे काही समाजकंटकांनी जैन मुनि काम कुमार नंदी यांची हत्या केली. त्याच्या निषेधार्थ भुसावळ सकल जैन समाजाने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.

 

कर्नाटक राज्यातील हिरेकोडी येथे जैन समाजाचे आचार्य काम कुमारजी नंदी यांचे काही दिवसांपूर्वी  अपहरण करून त्यांची हत्या केली होती. ही हत्या अत्यंत निर्घुण अशी होती. त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे करून हा अपराध केला आहे. या घटनेने संपूर्ण देशातील जैन समाजामध्ये  प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे हत्याकांड घडवून आणणारे हुसेन दलाईट व नारायण मानस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे खरे सूत्रधार कोण याचा तपास करावा जैन मुनिंना सुरक्षा प्रदान करावी या मागणीसाठी भुसावळच्या सकल जैन समाजातर्फे तहसील कचेरीवर मोर्चा नेऊन निवेदन देण्यात आले.


Protected Content

Play sound