परभणी घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परभणी येथे एका समाजकंटकाने भारतीय संविधानाचा अपमान केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे, अशा व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि या घटनेमागचा खरा सूत्र कोण याला चौकशी करून अटक करण्यात यावी असे मागणी, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात भीम आर्मी संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय संविधान हे सर्व जाती धर्मासाठी आहे, अश्या संविधानाचा अपमान परभणी जिल्ह्यात एका समाजकंटकाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली आह. दरम्यान संविधानाचा अपमान करणाऱ्याला कारवाई करा अशी मागणी करणाऱ्यांवरच उलट पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. त्यांच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवत आहे. यावरून प्रशासनाला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीने संविधानाचा अपमान केला, त्याच्यावर कारवाई सोडून इतरांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून संविधानाचा अपमान करणाऱ्या आणि त्याचा मागील खरा सूत्र कोण याची चौकशी करून त्याला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन भीम आर्मी च्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासनाला निवेदनातून केली आहे.

Protected Content