तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहान यांच्या विरोधात भाजपा महिला मोर्चातर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पश्चिम बंगाल येथील संदेशखली येथे महिलांवर झालेल्या अत्याचार विरोधात भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रंजनाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत फैजपूर प्रांत अधिकारी देवयानी यादव मॅडम यांना निवेदन दिले.

याप्रसंगी लोकसभा संयोजिका रेखाताई बोंडे, जिल्हा सरचिटणीस सारिका चव्हाण, जिल्हाचिटणीस सविता ताई भालेराव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सरलाताई कवडी वाले,यावल महिला मोर्चा तालुका अध्यक्ष जयश्री ताई चौधरी,रावेर महिला मोर्चा तालुका अध्यक्ष आशाताई सपकाळे, जिल्हा उपाध्यक्ष आशा ताई मोरे, रावेर तालुका चिटणीस लीना चौधरी,फैजपूर शहराध्यक्ष अनुराधा परदेशी, लता मेढे, दिपाली चौधरी,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या.

Protected Content