फेसबूक ग्रुपवर राज्य पातळीवर लेवा अभिवाचन ऑनलाईन स्पर्धा उत्साहात

यावल प्रतिनिधी । लेवा सखी कला मंच डोंबिवली व परिसर यांच्या वतीने लेवा पाटीदार कम्युनिटी या फेसबूक ग्रुपवर आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने राज्यपातळीवरील लेवा अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली असून स्पर्धेस अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. 

समाजातील सुप्त कलागुणांना चालना मिळावी  लहानापासून थोरा पर्यंत प्रत्येकाला या उपक्रमाच्या माध्यमातून  कला सहजतेने सादर करता यावी, या गोष्टीचा विचार करून लेवा  सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लेवा सखी कलामंच डोंबिवली व परिसरच्या अध्यक्षा निशाताई अत्तरदे (समाजसेवीका), श्रीमती इंदुमती पाटील, रागिणी फालक, मनीषा कोल्हे, भाग्यश्री पाचपांडे, शर्मिला जावळे, हर्षल जावळे या बंधु-भगिनींच्या सहकार्याने लेवा अभिवाचन स्पर्धा राबविण्यात आली. कार्यक्रम चालू असताना एका प्रकारे उत्साहाचं, चैतन्याच वातावरण निर्माण झाले होते, विशेष म्हणजे या उपक्रमाला उत्तम असा प्रतिसाद मिळाला. 

लेवा अभिवाचन या स्पर्धेचा अंतिम निकाल कोजागिरी पौर्णिमेला या शुभ दिवसाचे अवचित्य साधून जाहीर करण्यात आला. प्रथम गटातून मधून खुशी होले, श्रेयस झोपे, गौरव चौधरी तर द्वितीय गटामधून नेहा पाटील , निलिमा पाटील , डॉ. सुवर्णा नारखेडे, सुषमा पाटील. तृतीय गटातून मधून चंद्रशेखर पाचपांडे, डॉ. मंगला अत्तरदे, रंजना चौधरी, सुजाता भारंबे तसेच परीक्षक वैशालीताई पाटील व  पु. होले यांनी अनमोल सहकार्य केले.  सर्वांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले. तसेच लेवा कम्युनिटी या फेसबुक ग्रुपवर अभिवाचन स्पर्धेचे थेट प्रक्षेपण साठी नरेंद्र महाजन दादांनी सहकार्य केले. व लेवा शुभमंगल अँप यांचे पण खूप सहकार्य लाभले.

या प्रसंगी बी. ल. चौधरी दादांनी “मरी जाय झो” व खेमचंद पाटील यांनी “आपले हंबर्डी गाव” या पुस्तकांच्या प्रति देऊन लेवा सखी कला मंच डोंबिवली व परिसर यांना सहकार्य केले आहे.

 

Protected Content