जागतिक महिला दिनानिमित्त आजपासून जळगावात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन आयोजित गोदावरी फाउंडेशन व जैन स्पोर्ट्स अकॅडमी पुरस्कृत आंतर जिल्हा सब ज्युनिअर मुली फुटबॉल स्पर्धेला आज सोमवार ४ मार्चपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरुवात होत असून यात २२ जिल्ह्यातील ४५० महिला खेळाडू तसेच महिला निवड समितीचे पदाधिकारी, पंच १२ व प्रशिक्षक २२ अशा सुमारे ५०० महिलांचा जमावळा जळगावात महिला दिनाचा सप्ताह साजरा करणार आहे.

जळगाव जिल्ह्याचा संघ घोषित
सात दिवसापासून सुरू असलेला जळगाव जिल्हा फुटबॉल संघाची अंतिम निवड संघटनेचे सचिव फारुक शेख यांनी घोषित केली. सदर संघ निवड समितीमध्ये अर्जुन सनेर, उदय फालक, हिमाली बोरोले ,रोहिणी सोनवणे, छाया बोरसे व प्रा. डॉ.अनिता कोल्हे यांचा समावेश होता

निवड झालेला संघ खालील प्रमाणे

सिद्धी ठाकरे (कर्णधार) दिव्या बाविस्कर,( उप कर्णधार) अश्विनी ठाकूर, संस्कृती पाटील, निहारिका निंबाळकर, तिर्था नन्नवरे, दर्शना मोरे, कल्याणी अहिरे ,दिशा भोळे,मानसी, संस्कृती जोशी , ईशा ढाके, गार्गी वाणी, नेहा चव्हाण,
मनश्री जाधव, कनिष्का व्यास,जानवी मराठे, अनुष्का अहिरे, राखीव खेळाडू धनश्री महाजन, गार्गी खाचणे परी रंगलानी, युगंती पांडे.

व्यवस्थापक व प्रशिक्षक
संघ व्यवस्थापक छाया बोरसे (पोदार स्कूल),सहाय्यक व्यवस्थापक रोहिणी सोनवणे( सेंट जोसेफ) तर प्रशिक्षक हिमाली बोरोले( सेंट लॉरेन्स) व उदय फालक(विवेकानंद प्रतीस्टान) यांची नियुक्ती करण्यात आली.

सोमवारी होणारे सामने
१) रायगड विरुद्ध पुणे
२)औरंगाबाद वि ठाणे
३)नागपूर वि सोलापूर
४)यवतमाळ वि अहमदनगर
५)रत्नागिरी वि बुलढाणा
६)नांदेड वि धुळे
सकाळी ८ ला स्पर्धेला सुरवात ९ वाजता औपचारिक उद्घाटन व पुनश्च स्पर्धेला सूरवात संध्याकाळी ६ पर्यंत या स्पर्धेचा लाभ सर्व क्षेत्रातील महिला व क्रीडा प्रेमींनी घ्यावा असे आवाहन संघटनेचे मुख्य आश्रयदाते अशोक जैन, संघटनेचे तथा गोदावरी फाउंडेशन चेअध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील व सचिव फारुख शेख यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.

Protected Content