Home Cities यावल यावलच्या तुबा संस्थेचा राज्यस्तरीय गौरव सोहळा ; ३३ मान्यवरांचा सन्मान

यावलच्या तुबा संस्थेचा राज्यस्तरीय गौरव सोहळा ; ३३ मान्यवरांचा सन्मान


यावललाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील तुबा नाज हेल्प मल्टि पर्पज सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३३ मान्यवरांचा पंडित जवाहरलाल नेहरू व कस्तुरबा गांधी पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना एकत्र आणत प्रेरणादायी वातावरण निर्माण केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी मनोज देशमुख होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी विजय शांतीलाल पवार, सहाय्यक कृषी अधिकारी सतीश बाविस्कर (पालघर), एकता संघटन अध्यक्ष फारुक शेख (जळगाव), हकीम आर. चौधरी (मुक्ताईनगर), संस्था अध्यक्ष नाना डोंगरे, लोकनियुक्त सरपंच बबन खा तडवी यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचे कौतुक करत समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली.

कस्तुरबा गांधी पुरस्कारांतर्गत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना विशेष सन्मान देण्यात आला. यात निता सतिश बाविस्कर (इगतपुरी) यांना ग्रामगौरव, सिमा सुरेंद्र सूर्यवंशी (अमळनेर) यांना जीवनगौरव, मेहेर निगार फैजपूर यांना शिक्षणसेवा, माधुरी करडे (पुणे) व मयुरी खैरनार (नाशिक) यांना क्रीडा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय रुखसाना सैय्यद (धुळे) आदर्श नारी, सुमन पवार (धुळे) नारी शक्ती, उम्मे अनिसा बेगम (खामगाव) शिक्षण सेवा, सुवर्णा धनगर (चोपडा) लोकसेवा, डॉ. अर्चना सूर्यवंशी (पाळधी) नारीशक्ती, शबनम डफेदार (पुणे) आदर्श नारी, कल्पना दबडे (सांगली) नारीशक्ती, हेमलता गीते (अहिल्यानगर) साहित्य सेवा, डॉ. अस्मिता खिस्ती (अहिल्यानगर) आदर्श नारी आणि सरोज आल्हाट (अहिल्यानगर) समाजसेवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

पंडित जवाहरलाल नेहरू पुरस्कारांतर्गतही विविध क्षेत्रातील योगदानासाठी अनेक मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यात सतीश बाविस्कर (पालघर) यांना आदर्श व्यक्तिमत्व, आमोद नलगे (अहिल्यानगर) लोकसेवा, नाना डोंगरे यांना जीवनगौरव, धनेश्वर भोसले (पुणे) माजी सैनिक, भाऊसाहेब कदम (नेवासा), सुनील साळवी (पुणे) आदर्श व्यक्तिमत्व, विनोद पाठक (धुळे पोलिस) आदर्श व्यक्तिमत्व, राजेंद्र घोडके (पत्रकार) यांचा समावेश होता. तसेच डी.बी. पाटील, दशरथ पाटील (जळगाव) यांना जीवनगौरव, बबन खा तडवी यांना ग्रामगौरव, फारूक पटेल यांना आदर्श व्यक्तिमत्व, फारुक शेख यांना समाज भूषण, शेख मुन्शी खाटिक यांना मरणोत्तर समाज गौरव, शेख शब्बीर (अडावद) यांना शिक्षणसेवा, सैय्यद जाकीर अली (नगरदेवळा) गुणवंत शिक्षक व डॉ. शेख मोहम्मद इलयास (फैजपूर) यांना शिक्षणसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आमोद सुरेश नलगे यांनी समाजातील सकारात्मक बदलासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. यावेळी उपजिल्हाधिकारी मनोज देशमुख व फारुक शेख यांनीही मनोगत व्यक्त करत पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक फारुक पटेल यांनी केले, तर सूत्रसंचालन फारुख शाह नौमानी यांनी सुरेखपणे पार पाडले.

या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. जावेद शेख यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फारुक पटेल, शब्बीर सर, अय्युब शेख, अल्ताफ शेख, जुनेद पिंजारी, जुबेर मण्यार, अबूल मुजफ्फर शाह आणि सुफियान शाह यांनी विशेष सहकार्य केले.


Protected Content

Play sound