यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील युवा प्रगतीशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते किशोर देवराम राणे यांना राजंनदीनी बहूऊद्देशीय संस्था, जळगावच्या वतीने दिला जाणाऱ्या कृषी भुषण या राज्यस्तारिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावल नगर परिषदचे सतत सहा वेळा नगरसेवक पदावर राहिलेले जेष्ठ समाजसेवक व प्रगतीशील शेतकरी देवराम कृष्णा राणे यांचे चिरंजिव व आपल्या कृषीप्रधान संस्कृती जोपासुन शेतीत नाविन्यपुर्ण प्रयोग करीत विक्रमी उत्पादन तसेच केळी निर्यात मध्ये अग्रभागी राहणारे युवा शेतकरी किशोर देवराम राणे यांना जळगाव येथील राजदंनदीनी या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरिय कृषिभुषण २०२३- २०२४या पुरस्काराने जळगाव येथे अल्पबचत भवनात संस्थेच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झालेल्या पुरस्कार सत्कार सोहळ्यात सहपत्नीक सन्मानित करण्यात आले. किशोर राणे यांना राज्यस्तरिय कृषि भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,हेमराज फेगडे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे स्वागत करीत अभिनंदन केले .