जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चोपडा आणि पारोळा तालुक्यातील अवैध गावठी व हातभट्टी दारु तयार करणारे कारखान्यांसह ढाब्यांवर असे एकूण १९ ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली.
या कारवाईत सुमारे २ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्ह्यात अवैध गावठी दारु कारखाने सुरु असून मोठ्या प्रमाणात गावठी दारु तयार करुन त्याची विक्री केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक सीमा झावरे यांना मिळाली. त्यानुसार सोमवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळपासून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचार्यांचे पथकासह नाशिक विभागाच्या भरारी पथकांनी भरारी पथकाने पाचोरा तालुक्यातील गिरड, भडगाव तालुक्यातील टोणगांव, पारोळा तालुक्यातील तामसवाडी, चोपडा तालुक्यातील खाचणे याठिकाणावरील अवैध हातभट्टी दारु निर्मितीच्या केंद्रावर आणि इतर ठिकाणी सुरु असलेले अवैध गावठी व हातभट्टी दारु तयार करणारे कारखान्यांसह ढाबे असे एकूण १९ ठिकाणी कारवाई करुन उद्धवस्त करण्यात आले. या कारवाईत ४ हजार २९० लीटर कच्चे रसायन, १३५ लीटर गावठी दारु असा एकूण २ लाख ३१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण चव्हाण, किरण पाटील, चंद्रकांत पाटील, सुजित कपाटे, पोलीस निरीक्षक विकास पाटील, माधव तेलंगे, रिंकेष दांगट, विलास पाटील, आनंद पाटील, सत्यविजय ठेंगडे, विठ्ठल लहाके, लोकेश गायकवाड, नरेंद्र पाटील, अजय गावंडे, कुणाल सोनवणे, शशिकांत पाटील, प्रकाश तायडे, नितीन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.