पुणे प्रतिनिधी | टीईटी परिक्षेचा पेपर फुटल्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी एमएसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. गैरप्रकाराचा शोध घेण्यासाठी तुकाराम सुपे यांच्याकालपासून चौकशी करण्यात आल्यानंतर काल रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी आणि शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन केलं जातं. बीएड आणि डीएड झालेल्या विद्यार्थ्यांची शिक्षक पात्रता परिक्षा घेतली जाते. विद्यार्थी घडवणार्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षेची जबाबदारी असलेल्या तुकाराम सुपे यांनाच अटक झाल्याने आता या प्रकरणातील सत्य समोर येणार का ? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.