आगामी निवडणूकांसाठी आतापासूनच तयारीला लागा – आ. अनिल पाटलांच्या सूचना

अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी काळात होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातुनच लढविण्याचे आपले नियोजन असून नगरपरिषदेची निवडणूक देखील महाविकास आघाडी प्रणित शहर विकास आघाडी कडून लढविली जाईल, या निवडणूकांसाठी आतापासूनच तयारीला लागावे, अश्या सूचना आ.अनिल पाटील यांनी दिल्या. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अमळनेर मतदारसंघाची बैठकीत बोलत असून बैठक नांदेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी मतदारसंघाचे भूमिपुत्र आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ मुख्य प्रतोद अनिल भाईदास पाटील यांनी मार्गदर्शन करताना निवडणूकीच्या काही टिप्स देत अनमोल मार्गदर्शन केले.निवडणूका लांबत असल्याने आपल्याला नियोजन करण्यासाठी दोन ते तीन महिने मिळाले असल्याने त्याचा फायदा घ्यावा,राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी वर जनतेचा विश्वास असल्याने यश आपल्याच पदरात असेल कोणत्याही परिस्थितीत सर्व गट गण आणि पालिकेवर देखील आपला झेंड फडकवू अशी भावना आमदारांनी व्यक्त केली.

नवनियुक्त वि.का.सोसायटी चेअरमन व नवंनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार
यावेळी गणेश भामरे चेअरमन बाम्हणे सोसायटी, मिलिंद पाटील अमळगाव सोसायटी, संजय भिला पाटील अमळनेर सोसायटी, बाबूलाल पाटील कळमसरे सोसायटी, वसंत आनंदा पाटील सडावन सोसायटी, गोकुळ पाटील देवगाव देवळी, हिम्मत पाटील संचालक निंभोरा, रिटा बाविस्कर संचालक पातोंडा, गिरीश सोनजी पाटील प्रदेश उपाध्यक्ष-राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग, सुनिल शिंपी प्रदेश संघटक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदींचा सत्कार करण्यात आला.

बैठकीस जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील, जि.प.सदस्य हिम्मत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, चित्रपट विभागाचे गिरीश सोनजी पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील मिलिंद भाऊसाहेब पाटील, जिल्हाउपाध्यक्ष संजय पाटील, एल. टी. पाटील, महारु पाटील, प्रदेश समन्वयक रिता बाविस्कर, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम सर, राष्ट्रवादीचे प्रमुख अनिल आबा शिसोदे, महिला प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख, महिला धरणगाव निरीक्षक आशा चावरिया महिला तालुकाध्यक्षा मंदाकिनी भामरे, शहराध्यक्ष अलका पवार, अशोक पवार, प.स.सदस्य प्रविण पाटील, प.स.सदस्य निवृत्ती बागुल, प.स.सदस्य विनोद जाधव, प.स.सदस्य चंद्रकांत पाटील, भरती शिंदे, वैशाली ससाणे, योजना पाटील, कविता पवार, हिम्मत पाटील, भूषण भदाणे, वाल्मिक पाटील, सुधाकर पाटील, बाळू पाटील,लतीफ मिस्तरी, आरीफ पठाण, विवेक पाटील, गुणवंत पाटील, पृथ्वीराज पाटील, आबा महाजन, देविदास देसले, प्रशांत भदाणे, विजय जैन, रावसाहेब पाटील आबिद मिस्तरी, मुन्ना पवार, निलेश देशमुख, विनोद सोनवणे, प्रदिप पाटील, दर्पण वाघ, सुनिल शिंपी, सचिन वाघ, उमेश सोनार गौरव पाटील, निनाद शिसोदे,, शिरीष पाटील, रावसाहेब पाटील, हर्षल पाटील, अनिरुद्ध शिसोदे, सनी गायकवाड, नितिन भदाणे, बापु झुलाल पाटील, रणजित पाटील, बंटी पाटील, रामकृष्ण पाटील, भुषण पाटील, तसेच सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, बाजार समिती प्रशासक सदस्य, शेतकी संघ प्रशासक सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चेअरमन व संचालक मंडळ तसेच आजी, माजी सदस्य, पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Protected Content