ताप्ती सेक्शन वरून आषाढी एकादशी निमित्त पंढरपुर रेल्वे सुरू करा; प्रवासी मंडळाची मागणी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशीला महाराष्ट्राचे दैवत असलेले विठ्ठल रुक्मिणी यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक संपूर्ण देशातून पंढरपूर येथे दर्शन हेतू जातात. या करिता महाराष्ट्र परिवहन महामंडळ हजारो बसेस पाठविली जातात तसेच रेल्वे प्रशासन सुद्धा नागपूर, खामगाव, नांदेड, जालना, संभाजीनगर इथून पंढरपूर स्पेशल ट्रेन चालविली जातात. परंतु ताप्ती सेक्शन वरून पंढरपूर जायला एकही ट्रेन नाही. यासाठी धरणगाव तालुका प्रवासी मंडळ तर्फे अनेक वर्षापासून प्रयत्नशिल आहे.

याबाबत प्रवासी मंडळ तर्फे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, खासदार स्मिता ताई वाघ जळगाव मतदार संघ, जनरल मॅनेजर चर्च गेट, डी.आर.एम.मुंबई सेंट्रल यांच्याकडे पत्राद्वारे उधना पंढरपूर ट्रेन व्हाया नंदुरबार, अमळनेर,धरणगाव, जळगाव, मनमाड, दौंड मार्गे 1 जुलै ते 27 पर्यंत चालवावी अशी मांगणी धरणगाव तालुका प्रवासी मंडळ अध्यक्ष महेंद्र कोठारी, एस. डब्ल्यू. पाटील, रवींद्र भागवत आनंद बाचपाई, किरण वणी, डॉ. मिलिंद डहाळे, ललित येवले, हितेश पटेल, सुनील चौधरी, किरणसिंग परिहर, सुशील कोठारी, संतोष सोनवणे करण्यात आली.

Protected Content