धरणगाव (प्रतिनिधी) येथिल जनजाती मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचलेले आहेत. यावेळी संघाचे भय्याजी जोशी आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.
एरंडोल रोडवर तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी जळगावच्या विमानतळावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे,पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, महापौर सिमाताई भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी केले. धरणगाव येथिल जनजाती मेळाव्यास संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या स्थळी प्रचंड गर्दी आहे. यावेळी व्यासपिठावर संघाचे बाळासाहेब चौधरीयांच्यासह मोजकीच मंडळी होती. उपस्थित मान्यवरांसह सर्व नागरिकांनी क्रांतिकारी खाजा नाईक यांना अभिवादन केले.